पद्मभूषण वसंतरावदादा पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयात एम. एस. एम. ई. मंत्रालय भारत सरकार, पीव्हीपीआयटी तसेच समृद्धी टीबीआय फौंडेशन, सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने बौद्धिक मालमत्ता हक्क (IPR – इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट्स) या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. कार्यशाळेच्या उदघाटनाच्यावेळी संस्थेचे विश्वस्त मा. श्री अमितदादा पाटील यांनी मान्यवरांचे स्वागत व सत्कार केला. मनोगत व्यक्त करताना त्यांनी महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना याचा खूप उपयोग होईल अशी भावना व्यक्त केली.
समृद्धी फौंडेशनचे श्री. मनीष पाटील , एम. एस. एम. ई. चे संचालक श्री. अभय दफ्तरदार, खुराना ऍण्ड खुराना, आय. आय. पी. आर. डी. मुंबईचे वरिष्ठ सहयोगी परवेझ कुद्रोली, बॉट ऍण्ड ब्रेन्स चे संस्थापक श्री अन्श्युत कुमार व श्री प्रथमेश गोसावी यांनी आय.पी. आर अंतर्गत असणाऱ्या पेटंट, औदयोगिक डिजाईन, कॉपीराईट, ट्रेडमार्क इत्यादीवर सविस्तर मार्गदर्शन केले.
महाविद्यालयाच्या प्राचार्यानी संस्थेची व महाविद्यालयाच्या जडणघडणीचा व वाटचालीचा चढता आलेख तसेच महाविद्यालयात सुरु असणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली.