Padmabhooshan Vasantraodada Patil Institute of Technology

Contact

महाविद्यालयास दोन पेटंट सांगली.

बुधगाव येथील पद्मभूषण वसंतरावदादा पाटील महाविद्यलायच्या मेकॅनिकल विभागातील अंतिम वर्षाच्या पाच विद्यार्थ्यांनी ” पोर्टबल रेस्क्यू वॉटर बोट” तयार केली. सुमारे एक वर्षभर त्यांनी याच्या डिझाईन वरती काम करून या बोटला पेटंट देखील मिळवले. पेटंट कंट्रोलर्स ऑफ डिझाईन, इंडिया कडे सादर केलेले पेटंट स्वीकारल्याचे त्यांना २५ मे २०२० रोजी समजले. प्रसाद कुंभार, ऋषिकेश चव्हाण, साहिल पवार, अपर्णा खोत, शाहीन मोमीन अशी या विदयार्थ्यांची नावे आहेत. या प्रोजेक्ट वरती काम करण्याची प्रेरणा त्यांना सांगली, कोल्हापूर व सातारा येथे ऑगस्ट- २०१९ मध्ये आलेल्या महापुरानंतर मिळाली. हि प्रेरणा घेऊनच त्यांनी बोट डिझाईन केली. त्यावेळी त्यांनी हा देखील विचार केला कि हि बोट सामान्य माणूस ही विकत घेऊ शकेल. ह्या बोट मध्ये, आणीबाणीच्या वेळेस किमान दोन लोकांना तरी रेस्क्यू करता येईल. तसेच आणीबाणीच्या वेळेस एक ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी किमान ४० लोकांचे तरी जेवण नेता येणे शकय आहे. तसेच इतरवेळी बोटिंग करण्यासाठी ही ह्या बोट चा वापर करता येईल. या बोटच्या डिझाईन साठी प्रकल्प म्हणून मार्गदर्शक प्रा. पुरुषोत्तम पोळ यांनी काम पहिले. दुसरे पेटंट हे “शुगर केन लिफ्टींग मशीनला” मिळाले. उसाच्या शेतामध्ये ऊस काढून तो ट्रेलरमध्ये भरणे हे फारच कष्टाचे काम असते. कारण प्रत्येक मुळीचे सरासरी वजन हे 25 ते 30 किलो असते. ही अडचण लक्षात घेऊन महाविद्यालयातील मुलांनी त्याच्यावरती उपाय म्हणून शुगर केन लिफ्टींग मशीन डिझाईन केले. या मशीनला पेटंट कंट्रोलर ऑफ डिझाईन इंडिया ने मान्यता दिली. कृष्णा पोळ आणि संतोष होनराव या मेकॅनिकल विभागातील अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांनी हे शुगर केन लिफ्टींग मशीन डिझाईन केले. या मशीनसाठी प्रकल्प मार्गदर्शक म्हणून प्रा. मुकुंद हरुगडे व प्रा. सुधीर अडसूळ यांनी काम पहिले. महाविद्यालयाचे विश्वस्त अमितदादा पाटील यांनी मागील दोन वर्षांपासून संशोधन आणि नावीन्यपूर्ण गोष्टी वरती भर देण्यासाठी आराखडा तयार केला. तसेच सांगली भागातील समस्या व अडचणी याच्यवरती संशोधन प्रकल्प करण्यासाठी विद्यर्थ्यांना व प्राध्यपकांना प्रोत्साहित केले. या सर्व बदलमुळे मागील सहामहिन्यामधील हे मेकॅनिकल विभागाचे पाचवे पेटंट आहे. या सर्वामध्ये महाविद्यालयाचे संशोधन व विकास सेलचे प्रमुख डॉ. नंदकिशोर ढवळे, इन्स्टिट्यूट इनोव्हेशन सेलचे समन्वयक प्रा. मुकुंद हरुगडे, मेकॅनिकल विभागाचे विभाग प्रमुख -प्रा. सी. जी. हारगे, प्राचार्य डॉ. डी. व्ही. घेवडे, डीन-संशोधन व विकास प्रा. एन. व्ही. हरगुडे आणि डीन-शैक्षणिक प्रा. कुंभोजकर यांच्याकडून मोलाचे मार्गदर्शन मिळाले. तसेच संस्थेचे विश्वस्त श्री. अमितदादा पाटील व अध्यक्ष श्री. विशालदादा पाटील यांनीही पेटंट मिळवण्यासाठी विद्यर्थ्यांना व प्राध्यपकांना प्रोत्साहन दिले. Team